गुरुवार, १५ मार्च, २०१२

वाघ... इंजिन... कमळ ..( १५ मार्च २०१२) (संदर्भ: नाशिक महानगर पालिकेवर मनसेचा पहिला महापौर भाजप च्या पाठींब्यावर ... नाराज शिवसेनाचा सभात्याग )

वाघ... इंजिन... कमळ ..( १५ मार्च २०१२)
(संदर्भ: नाशिक महानगर पालिकेवर मनसेचा पहिला महापौर भाजप च्या पाठींब्यावर ... नाराज शिवसेनाचा सभात्याग )
त्यांच्या धनुष्यात बाण कमी पडले....
इंजिनाने पटकन आणून दिले...
म्हणून यांच्या सेनेचे ठाणे वाचले...
नाशिक ला उधारी बुडवायच ठरवलंच होतं...
पण नाशिक चा "गड " करी बनण्याचा निर्धार पक्का होतं...
मनसे "वाघ" तय्यार होता...
"यतीन" च्या मागे "नितीन" उभा होता...
नवीन समीकरणे जुळली...
एक सु ( चांगला)" धीर" करून " कमला" रेल्वेत बसली...
कमळ वाली रेल्वे " राज मार्गाने " निघाली...
" मी नाही जा' ... कट्टी फु... जुने वाघ गुरगुरले...
रेल्वेतून उतरले....
रेल्वे पुढे गेली... हे स्टेशन वर राहिले...
नव्या तरण्या " वाघाने " नाशिक दुमदुमले...
----- विराज काणेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा