गुरुवार, १५ मार्च, २०१२

वाघ... इंजिन... कमळ ..( १५ मार्च २०१२) (संदर्भ: नाशिक महानगर पालिकेवर मनसेचा पहिला महापौर भाजप च्या पाठींब्यावर ... नाराज शिवसेनाचा सभात्याग )

वाघ... इंजिन... कमळ ..( १५ मार्च २०१२)
(संदर्भ: नाशिक महानगर पालिकेवर मनसेचा पहिला महापौर भाजप च्या पाठींब्यावर ... नाराज शिवसेनाचा सभात्याग )
त्यांच्या धनुष्यात बाण कमी पडले....
इंजिनाने पटकन आणून दिले...
म्हणून यांच्या सेनेचे ठाणे वाचले...
नाशिक ला उधारी बुडवायच ठरवलंच होतं...
पण नाशिक चा "गड " करी बनण्याचा निर्धार पक्का होतं...
मनसे "वाघ" तय्यार होता...
"यतीन" च्या मागे "नितीन" उभा होता...
नवीन समीकरणे जुळली...
एक सु ( चांगला)" धीर" करून " कमला" रेल्वेत बसली...
कमळ वाली रेल्वे " राज मार्गाने " निघाली...
" मी नाही जा' ... कट्टी फु... जुने वाघ गुरगुरले...
रेल्वेतून उतरले....
रेल्वे पुढे गेली... हे स्टेशन वर राहिले...
नव्या तरण्या " वाघाने " नाशिक दुमदुमले...
----- विराज काणेकर

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

आज माझ्या आईचा वाढदिवस आहे...

गर्व आहे मला मराठी असण्याचा..
आज २७ february "जागतिक मराठी दिन ".....
कविवर्य कुसुमाग्रजांची जयंती म्हणून आपण हा दिन साजरा करण्याचा ठरवला...
आता ही प्रस्तावना लिहिण्याचे काही कारण नव्हते, बहुतेकांना हे माहित आहे ...... पण हे मी त्या कमनशिबी मराठी मित्रांना सांगणार आहे ज्यांना आज मराठी भाषा कळली नाही... न कळल्यामुळे आणि सो कॉल्ड glamour ( जे त्यांना म्हणे akon , MJ , वेस्टर्न मधूनच मिळते) नसल्यामुळे त्यान आज आमचे मराठी प्रेम उगाच फुकाचे वाटत आहे....
आता अश्या लोकांच्यामुले मराठी भाषेचं महत्व कमी होणार नाही हे सत्यच आहे...आपले कोंबडे झाकले म्हणून सूर्य काही मावळत नाही...आपण अंधारात राहतो..
आमच्या ज्ञानेश्वरांनी . तुकोबांनी समृद्ध केलेली ही भाषा अमृत आहे.... तिला न अनुभवणारे मृत होतील.... पण माझी मराठी कधीच नाही....
पण तरीही उगाच चूक चुकल्यासारखे वाटत राहते....की का माझीच मराठी भावंडे माझ्या आईपासून दूर जात आहेत??
त्यांना एकाच सांगावा वाटतं...की तुंम्ही खरच चुकत आहात...जीवनातल्या मोठ्या आनंद्पासून वंचित राहत आहात...
मराठी भाषेवर संकट येत आहेत... पण मराठीचेच संस्कार आहेत कि नव-नवे मावळे आई भवानीच्या आशीर्वादाने तय्यार होत आहेत...मराठीचे संरक्षण नव्हे मराठीचा झेंडा अटकेपार लावण्यासाठी.......
आज मराठी दिनापासून मी हा नवीन मराठी ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे....
माझा शुद्ध हेतू एवढाच आहे की मराठीचे तेज आणि मराठी माणसाचा स्वाभिमान यांचे संरक्षण व्हावे....
मराठी माणसाकडून झालेल्या चुका आपल्या पिढीला बदलून टाकायच्या आहेत...
आणि एक नवीन मराठी पिढी ....एक समृद्ध मराठी पिढी घडवण्याचे पुण्य कार्य आई भवानीने आपली खांद्यावर टाकला आहे...त्याचा मान ठेऊन आपण नवीन महाराष्ट्र घडवूया .....असा महाराष्ट्र कि अखिल जगाला त्याचा सार्थ अभिमान राहावा...
आज मुहूर्त छान...
म्हणून सुरवात केलीय...
गणपती बाप्पा जशी बुद्धी देईल तशी नव नवीन भर मी यात टाकेनच...
पण सध्या तरी...निदान आजतरी
सर्वाना जागतिक मराठी दिनाच्या शुभेच्छा देऊया...
सर्व wallpost , scrap, email, message याने भरून टाकू....
सर्व जगाला कळूद्या "आज माझ्या आईचा वाढदिवस आहे"...
jai hind
jai maharashtra.

--
Pr.VIRAJ S. KANEKAR
9867405764